Ashok Chavan Join BJP – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप मध्ये जाण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत आहे .येथुन पुढे भाजप मध्ये मी प्रामाणिकपणे काम करणार आहे . तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही काँग्रेस नेते आमच्या संपर्कात आहेत असा मोठा गौप्यस्फोट केला.
Ashok Chavan Join BJP – काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
Ashok Chavan Join BJP – आजचा दिवस आमच्यासाठी आणि भाजपसाठी खूप महत्वाचा आहे कारण माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आहे . ज्या नेत्याने लोकसभा आणि विधानसभा गाजवली तसेच दोन वेळा मुख्यमंत्री पद , विविध मंत्रीपदे असा तगडा प्रशासनाचा अनुभव असलेला नेता आज आमच्याकडे आला आहे . प्रथमतः मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सद्यस्त्वाचा फॉर्म भरून घ्यावा आणि अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घ्यावा .मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळेच देशातील अनेक नेत्यांना आज मोदीजींसारख्या मजबूत नेतृत्त्वासोबत यावसं वाटतंय, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ashok Chavan Join BJP – भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण ?
Ashok Chavan Join BJP – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांचं काम हे वाखाण्याजोगं आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला. त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात सत्ताआधारी आणि विरोधक यांचे संबंध कायमच राजकारणापलिकडे असतात. आज मी आज नवी सुरुवात करतो आहे. मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास आहे. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून पक्षात प्रवेश केला आहे.
Ashok Chavan Join BJP : भाजपात येण्याचा माझा निर्णय व्यक्तिगत – अशोक चव्हाण
“मी जिथे होतो तिथेही प्रामाणिकपणे काम केलं आहे. आजपासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आलो आहे इथेही प्रामाणिकपणेच आणि निष्ठेने काम करणार आहे. माझा जो अनुभव आहे त्यातून भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मी पक्ष सोडल्यावर अनेक लोक विरोधात बोलत आहेत. व्यक्तिगत स्वरुपाचे दोषारोप मी कुणावर केले नाहीत आणि करणारही नाही. भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मला कुणीही जा सांगितलेलं नव्हतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्याने मी भाजपात आलो आहे.” असंही अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan Join BJP – चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल का ?
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ashok Chavan Join BJP – अशोक चव्हाण यांच्याकडून अनावधानाने काँग्रेस पक्षाचा उल्लेख
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan BJP) यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलताना अडखळल्याचं दिसून आलं. सवयीप्रमाणे अशोक चव्हाण यांनी अनावधानाने काँग्रेस असा उल्लेख केला.
अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा उल्लेख केला. त्यानंतर आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हटलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.
हे ही वाचा – महाराष्ट्रातून भाजपातून कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?
महाराष्ट्रातील सर्व मराठी बातम्या वाचा .