Rajya Sabha Election 2024 | शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादीकडून कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?

Rajya Sabha Election 2024 – केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे त्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. नुकताच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट ) प्रवेश केला होता. तसेच राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) पुन्हा प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी दिली आहे.

Rajya Sabha Election 2024 – शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर

Rajya Sabha Election 2024 – काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले मिलिंद देवरा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मिलिंद देवरा यांनी मागील महिन्यात (जानेवारी ) शिवसेनेत प्रवेश केला होता. ते मूळचे काँग्रेस पक्षाचे होते परंतु महाराष्ट्राचे बदलेले राजकीय समीकरण आणि काँग्रेस पक्षातील नेतृत्वाचा अभाव यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे .

मिलिंद देवरा हे काँग्रेस कडून २००४ आणि २००९ असे दोन वेळा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत परंतु २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेत शिवसेनेचे (ठाकरे गट) अरविंद सावंत यांनी दोन्ही वेळा त्यांचा पराभव केला आहे.मात्र काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे महाविकास आघाडीत असल्याने ही जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याने त्यांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून न उतरवला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ते पुन्हा निवडणूक लढ्याच्या तयारीत होते परंतु त्यांना एकनाथ शिंदेनी राज्यसभेवर संधी दिली आहे.

राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुलभाई पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे .भाजप ,शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर अजित पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुलभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा अगोदरचा राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . मिळालेल्या माहितीनुसार प्रफुलभाई पटेल निवडून आल्यावर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कदाचित मे महिन्यात निवडणूक होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली . या पदासाठी पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत अशी माहिती मिळत आहे.

Rajya Sabha Election 2024 – काँग्रेस कडून मिळाली चंद्रकांत हांडोरे यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी.

Rajya Sabha Election 2024 – चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसनं आता सावध खेळी केलेली दिसत असून काँग्रेसने यंदा मात्र महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. याचाच अर्थ स्पष्ट होतंय की, आता भाजप आणि  मित्रपक्षांकडून यंदा महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाऊ शकतात. म्हणजे, काँग्रेसनं भाजप आणि मित्रपक्षांचे पाचही उमेदवार निवडून येतील, हे कुठे ना कुठे मान्य केलं आहे, असं स्पष्ट होत आहे. 

Rajya Sabha Election 2024 – गतवर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली होती .त्यावेळी चंद्रकांत हांडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यावेळी काँग्रेसमध्ये एकाच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार देऊन चंद्रकांत हांडोरे यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा केला आहे .

Rajya Sabha Election 2024का दिली काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी ?

Rajya Sabha Election 2024 – गतवर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी चंद्रकांत हांडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता त्यावेळी पासूनच त्यांची पक्षावर नाराजी आहे ती त्यांनी कित्येकदा बोलून सुद्धा दाखविली आहे. काँग्रेसने त्याना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे. चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेस पक्षाचा दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे . हंडोरे हे आंबेडकरवादी नेते असून सामाजिक-राजकीय संघटना ‘भीम शक्ती’चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री पदाची जबादारी पार पाडली आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची. त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने मुंबईसह राज्यातही काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दलित समीकरणे घट्ट करण्याचा सुद्धा काँग्रेस पक्षाने प्रयत्न केला आहे .

हे ही वाचा – भाजप कडून कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?

महाराष्ट्रातील सर्व मराठी बातम्या वाचा .

Join US