Pandhari Nath Shet Passed Away | पंढरीनाथशेट फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

Pandhari Nath Shet Passed Away – संपूर्ण महाराष्ट्रात ‘ छकडा फेम ‘ म्हणून प्रसिद्ध असणारे बैलगाडाप्रेमी गोल्डनमॅन पंढरीनाथ शेट फडके यांचे आज (बुधवार – २१ फेब्रुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले . आज दुपारी ते त्यांच्या ऑफिस वरून घरी येत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला . त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध ‘ बैलगाडा फेम ‘ म्हणून ओळख होती . ते मूळचे पनवेलच्या विहिघरचे या गावातील होते . लहानपणापासूनच त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती .

Pandhari Nath Shet Passed Away
Pandhari Nath Shet Passed Away – बैलगाडा फेम पंढरीनाथशेट फडके यांचे निधन

Pandhari Nath Shet Passed Away – कोण होते पंढरीनाथ शेट फडके ?

Pandhari Nath Shet Passed Away – बैलगाडा फेम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले तसेच महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि गोल्डन मॅन अशी ख्याती असलेले पंढरीनाथ शेट फडके यांचे आज दुःखद निधन झाले आहे . ते मूळचे पनवेलच्या विहिघर या गावाचे रहिवासी होते . त्यांना त्यांच्या वडिलांपासूनच म्हणजे १९८६ पासूनच बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती . सध्या त्यांच्याकडे ४० ते ५० शर्यतीचे बैल आहेत असे सांगण्यात येत आहे . त्यापैकी ‘ बादल ‘ हा त्यांचा आवडता बैल आहे .

बादल ‘ या त्यांच्या बैला बद्दल सांगायचे झाले तर , हा संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेला त्याचा बैल आहे . या बैलामुळे त्यांना बरीच बक्षीच सुद्धा मिळाली आहेत . तसेच त्यांचा बैलगाडा शर्यतीच्या वेळीचा गाडीच्या टपावरील डान्स सुद्धा भरपूर प्रसिद्ध झाला होता . ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असायची त्यावेळी ते पूर्ण गळाभर आणि अंगावर सुद्धा जवळपास १ किलो सोने घालून यायचे त्याच्या या लुक मुळे ते अधिकच प्रसिद्ध झाले .

पंढरी शेट फडके यांना बैलगाडा शर्यतीची इतकी आवड होती की कोणत्याही बैलगाडा शर्यती वेळी त्यांना एखादा शर्यतीचा चांगला बैल दिसला की ते लगेच त्या बैलाला आपल्या दावणीत कसे घ्यायचे याचा प्रयत्न करताना दिसायचे . एके ठिकाणी तर त्यांनी तब्बल ११ लाख रुपये देऊन जिंकणारा एक बैल खरेदी केला होता . यावरूनच त्यांना बैलांची आणि बैलगाडा शर्यतींचा किती आवड हे आपल्या लक्षात येत असेल .

महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असलेले पंढरीनाथ शेट फडके यांनी महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये बैलगाडा शर्यती संबधी एक वेगळीच आकर्षकता निर्माण केली होती . विशेषतः पूर्ण अंगभर सोने घालून आल्यामुळे त्यांचे तरुणांमध्ये आकर्षण होते . तसेच कोरोनामुळे बंद पडलेल्या शर्यती चालू करण्यामध्ये त्यांचा एक विशेष वाटा होता त्यासाठी त्यांनी अनेक मंत्री आणि खासदार यांच्या गाठीभेटी सुद्धा घेतल्या होत्या .

पंढरी शेट फडके हे सुरुवातीच्या काळात शेकाप मध्ये सक्रिय होते . परंतु नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला . १९८६ नंतर त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आणि त्यामधून त्यांनी अमाप पैसाही कमावला . तसेच महाराष्ट्रात बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती चालू करण्यामध्ये त्याचा महत्वाचा वाट राहिलेला आहे . जिथे जिथे बैलगाडा शर्यत व्हायच्या तिथे पंढरीशेट फडके यांचा गाडा धावणार नाही असे असं फार क्वचित व्हायचं.

Pandhari Nath Shet Passed Away – पंढरीशेट फडके यांना का झाली होती अटक ?

Pandhari Nath Shet Passed Away – अंबरनाथमध्ये २०२२ मध्ये बैलगाडा शर्यत चालू असतानाच वाद होऊन १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांच्यासह  एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०२२ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांना काही महिने अटक सुद्धा झाली होती . परंतु ते सध्या जामिनावर बाहेर होते . २०२० मध्येही त्यांनी पनवेल मध्ये क्रिकेटच्या उद्धघाटनावेळी हवेत गोळीबार केला होता त्यावेळी त्यांनी एकूण ४ राऊंड हवेत गोळीबार केले होते . तसेच त्यांच्या कार्यकर्त्यानी सुद्धा त्यांच्यावर पैशांच्या नोटाही उधळल्या होत्या . याप्रकरणी पंढरी शेट फडके यांना त्यावेळी सुद्धा अटक झाली होती .

Pandhari Nath Shet Passed Away – बैलगाडा शर्यतीत नंबर एक येण्याचे काय होते सिक्रेट ?

Pandhari Nath Shet Passed Away – पंढरीनाथ शेट फडके यांच्याकडे ‘ बादल ‘ नावाचा एक महाराष्ट्रातील नंबर एकचा बैल होता . बादलचा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग होता . याच बादलने ११ लाख रुपये असलेली बैलगाडा शर्यत जिंकली होती. त्यावेळी पासूनही तो महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाला होता . बादलचे नंबर एक येण्याच रहस्य असे होते की त्याचा असलेला खुराक . बैलांसाठी पिस्ता , खोबरं , डाळ , काजू , बदाम , शेंगदाणे अशा या खुराकामुळे त्यांची बैलसुद्धा तंदुरुस्त राहायची. तसेच व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखणं अशामुळे ते कायम बैलगाडा शर्यती मध्ये कायम नंबर एक असायचे .

हे हि वाचा – मराठा समाजाला मिळणार १० टक्के आरक्षण .

महाराष्ट्रातील सर्व राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचा .

Join Us

Leave a Comment