Manohar Joshi Passed Away – माजी मुख्यमंत्री आणि ज्यांची एक कडवट शिवसैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सर यांचे आज (२३ फेब्रुवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले . गुरुवारी (२२ फेब्रुवारी) रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले होते . तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालविली आहे.
अंत्यदर्शनासाठी त्यांना रुपारेल कॉलेज , माटुंगा पश्चिम येथील त्यांच्या सध्याच्या राहत्या निवास्थानी ठेवण्यात येणार असून दुपारी दोन नंतर त्याची अंत्ययात्रा सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे . माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांच्यावर दादर येथील स्मशान भूमिमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत .
मनोहर जोशी यांना याआधी मे २०२३ च्या दरम्यान ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता . त्यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये खूप रक्तस्राव झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती . त्यानंतर मनोहर जोशी जवळपास एक महिना रुग्णालयातच उपचार घेत होते . त्यानंतर त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता . पण काल अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली आहे.
Manohar Joshi Passed Away – कोण होते मनोहर जोशी ?
Manohar Joshi Passed Away – मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याश्या गावात २ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता . घरची परिस्थिती अत्यंत्य बिकट वडील भिक्षुकी म्हणून काम करायचे तसेच स्वतः मनोहर जोशी हे सुद्धा भिक्षुकी करायचे . परंतु अशा परिस्थितीतही त्यांच्यामध्ये शिकण्याची भरपूर इच्छा होती . त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे असे करून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणासाठी ते त्यांच्या बहिणीकडे म्हणजेच थेट मुंबईला ला पोहोचले .
मनोहर जोशी मुंबईला गेल्यावर त्यांनीसर्वप्रथम सहस्रबुद्धे क्लासेस मध्ये शिपायाची नोकरी करत करत ११ वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले . तसेच पुढे जाऊन त्यांनी मुंबई च्या कीर्ती महाविदयालयातून पदवीचे ( बी .ए ) शिक्षण पूर्ण केले . आणि पुढे जाऊन त्यांना मुंबई महापालिकेत क्लार्क या पदाची नोकरी मिळाली . तसेच पुढे वयाच्या २७ व्या वर्षी ते एम.ए. , एल एल.बी. झाले त्यानंतर काही काळ ते शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत होते . दरम्यान १९६४ साली त्यांचा विवाह अनघा यांच्यासोबत झाला . त्यांना एक मुलगा आणि दोन मुली सुद्धा आहेत .
Manohar Joshi Passed Away – कसा होता मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास .
- 2 वेळा नगरसेवक
- 3 वेळा विधानपरिषद सदस्य
- मुंबई महानगरपालिका महापौर
- 2 वेळा विधानसभा सदस्य
- विरोधी पक्षनेता – विधानसभा
- मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य
- केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
- लोकसभा अध्यक्ष
- राज्यसभा खासदार
Manohar Joshi Passed Away – शिवसेनेत कसे आले मनोहर जोशी ?
Manohar Joshi Passed Away – मनोहर जोशी यांच्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा सुद्धा उमटवला . १९६४ साली त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसताना ते शिवसेनेत आले . ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना (१९६६ साली) केली . त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळख सुद्धा नव्हती .
१९६७ च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यामध्ये एक सभा होती . त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची सर्व भाषणे श्रीकांत ठाकरे रेकॉर्ड करत होते . त्या सभेवेळी बाळासाहेब ठाकरे हे आपली कार घेऊन पुण्याला गेले आणि भाषण रेकॉर्ड करण्याचे साहित्य मुंबईमध्येच राहिले . अशावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशी यांना भाषण रेकॉर्ड करण्याचे साहित्य पुण्याला नेण्याची जबाबदारी दिली . पुढे मनोहर जोशी हे भाषण रेकॉर्डचे करण्याचे साहित्य आणि श्रीकांत ठाकरे यांना आपल्या कार मध्ये घेऊन पुण्याला रवाना झाले . सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरे यांनी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ओळख करून दिली आणि पुढे जाऊन दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली त्यामुळेच मनोहर जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला .
मनोहर जोशी यांना ठाकरेंच्या चार पिढी सोबत काम करण्याचा अनुभव :
शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून मनोहर जोशी हे शिवसेनेत काम करत आहेत . त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेना या एका पक्षासाठी दिले होते . शिवसेना वाढवण्यात त्यांचा एक मोलाचा वाट राहिला आहे . तसेच प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे अश्या ठाकरेंच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची संधी सुद्धा मनोहर जोशी यांना मिळाली आहे .
उद्धव ठाकरेंचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता :
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा आज हिंगोली आणि बुलढाणा दौरा आयोजित करण्यात आला होता .परंतु मनोहर जोशी यांच्या निधनाच्या बातमीनंतर कदाचित उध्दवजी ठाकरे यांचा दौरा रद्द होऊ शकतो . मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत , विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटर वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली .
हे हि वाचा – मराठा समाजाला मिळणार १० टक्के आरक्षण .
महाराष्ट्रातील सर्व मराठी बातम्या वाचा .