IPL 2024 Schedule | आज जाहीर होणार IPL 2024 चे वेळापत्रक .

IPL 2024 Schedule – आयपीएलच्या १७ व्या हंगामा बद्दल एक मोठी बातमी आली आहे . आज IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर होणार आहे अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण माळी यांनी दिली . आयपीएलचे अध्यक्ष अरुण माळी यांनी दोनच दिवसांपूर्वी आयपीएलच्या संदर्भात एक अपडेट दिली होती की २२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम चालू होणार आहे . आयपीएलच्या या हंगामावेळी लोकसभा निवडणुका असल्यामुळे ह्या वेळेचे आयपीएलचे सामने कदाचित दोन टप्प्यात होणार आहेत अशीही माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण माळी यांनी दिली आहे.

IPL 2024 Schedule
IPL 2024 Schedule – आज जाहीर होणार IPL 2024 चे वेळापत्रक .

IPL 2024 Schedule – आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक कधी जाहीर होणार ?

IPL 2024 Schedule – आयपीएलच्या १७ व्या हंगामाबद्दल बोलताना आयपीएलचे अध्यक्ष अरुण माळी असेही म्हणाले की , ह्यावेळीचा आयपीएलचा हंगाम आणि देशातील लोकसभा निवडणूका एकत्रित आल्यामुळे आम्ही प्रथमतः पहिल्या १५ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे . उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखेनंतर जाहीर करणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण माळी यांनी दिली . या हंगामा मधील पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये २२ मार्च ला चेन्नई मध्ये होणार आहे .

चेन्नई सुपर किंग्स ९व्या वेळी सलामीचा सामना खेळणार असून अन्य फ्रांच्यायझीच्या तुलनेत ते सर्वाधिक आहे . हार्दिक पांड्या गुजरात कडून पुन्हा एकदा त्याचा मूळचा संघ मुंबई इंडियन्स मध्ये सामील झाला आहे त्यामुळे ह्या पर्वाची सर्वांना उत्सुकता असणार आहे . तसेच आयपीएलची लीग चालू होण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी दुखापती मुळे पूर्ण हंगाम बाहेर असणार आहे आणि विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स ला त्यांचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम मध्ये खेळावे लागणार आहेत . तसेच गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन म्हणून शुभमन गिलचा पहिला सीझन कसा असेल याचीही उत्सुकता चाहत्यांना असणार आहे .

IPL 2024 Schedule – आयपीएल २०२४ चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २२ मार्च – चेन्नई – रात्री ८ वाजता पासून
  • पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – २३ मार्च – मोहाली – दुपारी ३.३० वाजता पासून
  • कोलकत्ता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – २३ मार्च – कोलकत्ता – रात्री ८ वाजता पासून
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – २४ मार्च – जयपूर – दुपारी ३.३० वाजता पासून
  • गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – २४ मार्च – अहमदाबाद – रात्री ८ वाजता पासून
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स – २५ मार्च – बंगळुरू – रात्री ८ वाजता पासून
  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स – २६ मार्च – चेन्नई – रात्री ८ वाजता पासून
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – २७ मार्च – हैदराबाद – रात्री ८ वाजता पासून
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – २८ मार्च – जयपूर – रात्री ८ वाजता पासून
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स – २९ मार्च – बंगळुरू – रात्री ८ वाजता पासून
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स – ३० मार्च – लखनौ – रात्री ८ वाजता पासून
  • गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – ३१ मार्च – अहमदाबाद – दुपारी ३.३० वाजता पासून
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – ३१ मार्च – विशाखापट्टणम – रात्री ८ वाजता पासून
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – १ एप्रिल – मुंबई – रात्री ८ वाजता पासून
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – २ एप्रिल – बंगळुरू – रात्री ८ वाजता पासून
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स – ३ एप्रिल – विशाखापट्टणम – रात्री ८ वाजता पासून
  • गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स – ४ एप्रिल – अहमदाबाद – रात्री ८ वाजता पासून
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – ५ एप्रिल – हैदराबाद – रात्री ८ वाजता पासून
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ६ एप्रिल – जयपूर – रात्री ८ वाजता पासून
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – ७ एप्रिल – मुंबई – दुपारी ३.३० वाजता पासून
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स – ७ एप्रिल – लखनौ – रात्री ८ वाजता पासून

IPL 2024 Schedule – टाटा ग्रुप देणार पुढील ५ वर्षे आयपीएला देणार बक्कळ रक्कम .

काही दिवसांपूर्वी आयपीएलने टायटल हक्कासाठी एक जाहिरात काढली होती . या हक्कासाठी आदित्य बिर्ला ग्रुप प्रयत्नशील होता परंतु टाटा समूहाने आयपीएलचे पुढील ५ वर्षाचे टायटल हक्क जिंकले आहेत . त्यामुळे इथून पुढे २०२८ पर्यंत TATA IPL पाहायला मिळणार आहे . त्यामुळे दरवर्षी टाटा ग्रुप आयपीएला सुमारे ५०० कोटी रुपये देणार आहे .

हे हि वाचा – रविचंद्रन अश्विनने ५०० विकेट्स घेऊन कसोटी क्रिकेट मध्ये रचला इतिहास .

महाराष्ट्रातील सर्व क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचा .

IPL 2024 Schedule
IPL 2024 Schedule

Leave a Comment