Maratha Reservation News – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मंगळवारी (२० फेब्रुवारी) रोजी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते . या अधिवेशनात मराठा आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाणार होता परंतु तत्पूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तसा प्रस्तावही मंत्रिमंडळ बैठकीतही मंजूर करण्यात आलं . विशेष म्हणजे हे विधेयक चर्चेविना आणि एकमताने मंजूर झाले आहे .
Maratha Reservation News – कोणत्याही समाज्याचा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maratha Reservation News – अनेक दिवसाच्या तीव्र मागणीनंतर अखेर मंगळवारी (२० फेब्रुवारी) रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला . महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच मराठा समाजाला दिलेले हे आरक्षण सर्वोच न्यायालयात टिकणार आहे याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली .
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की , मी दसरा मेळावा दिवशी शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणारच आणि ते पण ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आज ती शपथ मी खरी करून दाखविली आहे .ज्यावेळी मी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी मी त्यांना मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द दिला होता . मराठा समाज आरक्षणामुळे अडचणीत आला होता . त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मी अन्य समाज्याच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असा सुद्धा शब्द मी दिला होता . आणि आज तो शब्द मी खरा करून दाखवला आहे याचा मला स्वार्थ अभिमान आहे .
मराठा आरक्षणावर आतापर्यंत ६ लाख हरकती आल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्या त्रुटींवर राज्य सरकार काम करत आहे . सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकून राहावे यासाठी राज्य सरकार पूर्णपणे ताकद लावीत आहे त्यासाठी विरोधी पक्षानांही सोंबत घेतले आहे . कुणबी दाखला संदर्भात ही समिती काम करत आहे. सहा लाख हरकती आलेल्या आहेत. यावर प्रक्रिया सुरु आहे. जी अधिसूचना काढली आहे त्यावर हरकती आल्या आहेत. त्यावर छाननी सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. १९६७ पूर्वी ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांना आरक्षण मिळणार आहे तसेच हे आरक्षण देताना ओबीसी समाजाला धक्का पोहोचविणार नाही असेही आवर्जून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
Maratha Reservation News – मराठा आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो परंतु मराठ्यांची ही मागणी नाही आहे – मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation News – मंगळवारी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचे मी स्वागत करतो परंतु प्रामुख्याने ही मराठा समाजाची मागणी नाही आहे . त्यामुळे मी मराठा समाज्याच्या मागणीवरून हटू शकत नाही त्यामुळे राज्यभरातील मराठा आंदोलक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे . तसेच राज्य सरकारने मराठा आंदोलनाचा विषय हा गांभीर्याने घ्यायला हवा होता . माझी एवढीच मागणी आहे की सरकारने गोरगरीब मराठ्यांची चेष्टा करू नये आणि मराठा समाज्यच्या मागणी नुसार लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली .
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजाने विश्वास ठेऊन त्यांना ६ महिन्यांचा वेळ दिला होता. आमचं आरक्षण आम्हाला पाहिजेच आहे . प्रत्येक वेळी हरकतीचा विषय पुढे करून चालणार नाही. जो काही हरकतीचा विषय असेल , तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे त्याचा उपयोग करून आरक्षणाचा विषय सोडवू शकता .आजपर्यंत मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला आहे तरी त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले .
Maratha Reservation News – मागासवर्गीय आयोग्याच्या अहवालात नेमके काय नमूद केले आहे ?
महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाने दिला आहे आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे. राज्यात मराठा समाज २८ टक्के आहे, तर सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या प्रवर्गात मोठ्या संख्येने जाती व गट आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देता येणार नाही अशी माहिती देखील मागासवर्ग आयोगाने दिली आहे. न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करून हा संपूर्ण अहवाल तयार केला आहे.
हे ही वाचा – कुणाला मिळाली भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी ?
महाराष्ट्रातील सर्व राजकीय बातम्या वाचा .