Ravichandran Ashwin Record in Test Cricket । रविचंद्रन अश्विनने ५०० विकेट्स घेऊन कसोटीमध्ये रचला इतिहास – भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे चालू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक विश्वविक्रम केला आहे . रविचंद्रन अश्विनने ५०० विकेट्स घेऊन कसोटीमध्ये एक इतिहास रचला आहे .भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चालू असलेल्या कसोटी सामनाच्या दुसऱ्याच दिवशी (१६ फेब्रुवारी ) विकेट घेऊन अश्विनने कसोटी क्रिकेट मध्ये ५०० विकेटचा टप्पा पार केला आहे . अनिल कुंबळे नंतर ५०० विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
Ravichandran Ashwin Record in Test Cricket – रविचंद्रन अश्विनने ५०० विकेट्स घेऊन कसोटीमध्ये रचला इतिहास अनिल कुंबळेला टाकले मागे
Ravichandran Ashwin Record in Test Cricket – रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेट मध्ये ५०० विकेट्स घेऊन एक नवा इतिहास रचला आहे . भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे नंतर ५०० विकेटचा टप्पा गाठणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे . सध्या राजकोट येथे चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामना दरम्यान इंग्लंडच्या जॅक क्रॉलीला बाद करून त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे .
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५०० विकेट्स घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने ९८ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. कसोटीत सर्वात जलद ५०० विकेट्स घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, ज्याने ८७ व्या कसोटीत ही अनोखी कामगिरी केली. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने १०५ कसोटीत हा विक्रम केला होता आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या १०८ व्या कसोटीत हा विक्रम केला होता. म्हणजेच सर्वात वेगवान 500 बळी घेण्याच्या बाबतीत अश्विनने वॉर्न आणि कुंबळेला मागे टाकले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो पाचवा फिरकी गोलंदाज ठरलेला आहे आणि ५०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील नववा गोलंदाज ठरला आहे .श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने कसोटीत ८०० सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत तसेच शेन वॉर्न ७०८ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आणि जेम्स अँडरसन ६९५* विकेटसह सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळे हे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत त्यांनी १३२ कसोटी सामन्यात विकेट घेतल्या आहेत. त
Ravichandran Ashwin Record in Test Cricket – कसोटी मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
1. मुथैय्या मुरलीधरन – (1992-2010) – श्रीलंका – 133 कसोटी सामने – 800 विकेट्स
2. शेन वॉर्न – (1992-2007) – ऑस्ट्रेलिया – 145 कसोटी सामने – 708 विकेट्स
3. जेम्स अँडरसन – (2003-2023) – इंग्लंड – 185* कसोटी सामने – 696* विकेट्स
4. अनिल कुंबळे – (1990-2008) – भारत – 132 कसोटी सामने – 619 विकेट्स
5. स्टुअर्ट ब्रॉड – (2007-2023) – इंग्लंड – 167 कसोटी सामने – 604 विकेट्स
6. ग्लेन मैक्ग्रा – (1993-2007) – ऑस्ट्रेलिया – 124 कसोटी सामने – 563 विकेट्स
7. कर्टनी वॉल्श – (1984-2001) – वेस्टइंडीज – 132 कसोटी सामने – 519 विकेट्स
8. नेथन लायन – (2011-2023) – ऑस्ट्रेलिया – 127* कसोटी सामने – 517* विकेट्स
9. रविचंद्रन अश्विन – (2011-2023) – भारत – 98* कसोटी सामने – 500* विकेट्स
सर्वात कमी कसोटीमध्ये जास्त विकेट घेणारे गोलंदाज –
- मुथय्या मुरलीधरन – ८७ कसोटी
- रविचंद्रन अश्विन – ९८ कसोटी
- अनिल कुंबळे – १०५ कसोटी
- शेन वॉर्न – १०८ कसोटी
- ग्लेन मॅकग्रा – ११० कसोटी
सर्वात जलद ५०० कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज (चेंडूनुसार) –
- ग्लेन मॅकग्रा – २५५२८ चेंडू
- रविचंद्रन अश्विन – २५७१४ चेंडू
- जेम्स अँडरसन -२८१५० चेंडू
- स्टुअर्ट ब्रॉड – २८४३० चेंडू
- कोर्टनी वॉल्श – २८८३३ चेंडू
भारतीयांकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स –
- अनिल कुंबळे – ६१९ विकेट्स
- आर अश्विन – ५०० विकेट्स
- कपिल देव – ४३४ विकेट्स
- हरभजन सिंग – ४१७ विकेट्स
- इशांत शर्मा – ३११ विकेट्स
Ravichandran Ashwin Record in Test Cricket – रविचंद्रन अश्विनची आजपर्यंतची कसोटीतील कामगिरी
रविचंद्रन अश्विनची आजपर्यंतची कसोटी कारकिर्द बघितली तर आजपर्यंत अश्विनने भारताकडून ९८ कसोटी सामने खेळलेले आहेत त्यामध्ये त्याने ५०० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच रविचंद्रन अश्विनने कसोटी सामन्यात ५१.४५ च्या स्ट्राईक रेटने आणि २३.८९ च्या सरासरीने ह्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत . याशिवाय त्याने ८ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. या भारतीय दिग्गज खेळाडूने कसोटी सामन्यात ३४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच ९८ कसोटी सामन्यात ५०० विकेट्स घेऊन रविचंद्रन अश्विनन महान खेळाडूंच्या यादीत सामील आहे .
हे हि वाचा – किलियन एम्बाप्पे खेळेल का रिअल माद्रिद क्लबकडून ?
महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रातील सर्व बातम्या मराठीतून वाचा .
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but other than that this is fantastic blog A great read Ill certainly be back
Thank you