Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List – भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या नवीन उमेदवारीची यादी बुधवारी जाहीर केली आहे . महाराष्ट्रातून अशोक चव्हाण , मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी भेटली आहे . यातील अशोक चव्हाण यांनी मंगळवारीच भारतीय जनता मध्ये प्रवेश केला होता आणि आजच त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच कोथरूडच्या माझी आमदार मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर डॉ. अजित गोपछडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन भाजपने तळागाळातील कार्यकर्त्याच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला आहे.
Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List – कोण आहेत भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेले अशोक चव्हाण ,मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे .
Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List – अशोक चव्हाण हे मूळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी मंगळवारीच (१३ फेब्रुवारी ) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत तसेच त्यांना विविध मंत्री पदाचा आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे . त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केले आहे .त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
मेधा कुलकर्णी या पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार आहेत परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचे तिकीट कापून त्यावेळीचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली . तेव्हापासूनच त्या नाराज आहेत तसेच त्यांनी आपली नाराजी कित्येकदा बोलून पण दाखवली आहे . त्यांना उमेदवारी देऊन भाजपने चंद्रकांत पाटील यांची मार्ग मोकळा केला आहे.मेधा कुलकर्णी या प्राध्यापिका आहे. उच्चविद्याविभूषित असलेला चेहरा संसदीय राजकारणामध्ये भाजपला उपयोगी ठरु शकतो. मेधा कुलकर्णी याचं कार्य आणि त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिका पाहिल्या तर त्या स्पष्टवक्ता आहे. त्यासोबतच त्या आक्रमक भूमिक घेण्यासाठी ओळखल्या जातात. राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडताना त्या कायम तत्पर असल्याचं पाहायला मिळालं आहे. याआधी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे वाददेखील निर्माण झाले आहेत. मात्र त्यांच्या आक्रमकपणासाठी त्या ओळखल्या जातात.कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी ब्राह्मण उमेदवार नसल्याचं ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने ब्राह्मण उमेदवाराचादेखील डाव साधला आहे.
डॉ. अजित गोपछडे यांना सामाजिकतेचा वारसा हा त्यांच्या अगदी घरण्यापासून मिळाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहिले आहे. ते बालरोगतज्ज्ञ असून नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा होती. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी मिळताच त्यांच्या पक्षनिष्ठेला फळ मिळाल्याची चर्चा होऊ लागली आहे. डॉ. अजित गोपछडे यांचं मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. त्यांचे गोपछडे कुटुंब हे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहिले आहे.अजित गोपछडे अगदी महाविद्यालयामध्ये असल्यापासून त्यांनी मार्ड चळवळीचे नेतृत्व केले. हे काम करत असताना त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितिन गडकरी यांच्या माध्यमातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले.
Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List – भाजपकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया
याबद्दल प्रतिक्रिया देत असताना अशोक चव्हाण म्हणाले की, आज माझे नाव राज्यसभेसाठी जाहीर केल्यामुळे मी भाजपाचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मला आनंद वाटतो. या नेत्यांनी माझ्यासारख्या पक्षात नव्या आलेल्या नेत्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.
Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List – भाजपकडून राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपकडून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी पक्षातील नेत्यापेक्षा वेगळ्या भूमिकादेखील घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं म्हणत त्यांनी जुन्या नाराजीवर बोलणं पसंत केलं नाही.
Rajya Sabha Election 2024 -भाजपकडून राज्यसभेसाठी डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया
डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाची भाजपने घोषणा केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘उमेदवारीची बातमी मलाही माध्यमांतून बातमी आल्यानंतरच समजली आहे. त्यामुळे साहजिकच मला आश्चर्याचा धक्का बसला असंही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा – का केला अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश ?
शिवसेनेकडून (शिंदे गट) कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?
राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?
काँग्रेस कडून कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी ?
महाराष्ट्रातील सर्व मराठी बातम्या वाचा.